सर्व जागा स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी : संजय वाघचौरे

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती सह नगर परिषदेसाठी आघाडी ची तयारी आहे. आघाडी न झाल्यास आमची स्वबळाची तयारी देखील आहे. कार्यकर्त्यांनी त्या अनुषंगाने तयारी करावी असे आवाहन माजी आमदार संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पैठण येथे आढावा बैठकीत बोलताना केले.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे, माजी जिप आध्यक्ष हरीश्चंद्र लघाणे, गोविंद शिंदे, विशाल वाघचौरे, शहराध्यक्ष उमेश पंडुरे, विलास शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

संजय वाघचौरे यांनी सांगितले की, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणायच्या आहेत, नगर परिषद निवडणुकीसाठी आपण जास्तीत जास्त मायालाई जंगले,.श्री. अतुल लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. गट्टू बसविले किंवा वॉल कंपाऊंड केले याला विकास म्हणता येणार नाही. पैठण तालुक्यात खऱ्या अर्थाने योजना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आणल्या गेल्या, इतरांनी याचे श्रेय घेऊ नये असे सांगितले 

यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबद्दल नाराजी व्यक्त केली वेळत जागा वाटप ठरले पाहिजे असे सांगितले. यावेळी राजेंद्र उगले, शेखर देशमुख, तोसेफ पटेल, ज्ञानेश्वर कागदे, उदय तवार, लतीफ कुरेशी, आप्पासाहेब खंडागळे, अरुण राठोड, निरंजन पापुलवार, इरफान बागवान, मनोहर एरंडेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष साठी अनिता पंडुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष उमेश पंडुरे यांच्या पत्नी अनिता पंडुरे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी वर यावेळी शिक्कामोर्तब केला.